General Information:- Year of Establishment 1997-98 The total built up area of the department is about 1000 sq. feet. Consist of one testing room and laboratory, five cubicals, Cabin for the head of the Department and Faculty Members. A Laboratory is well equipped with latest psychological instruments and different psychological tests. The department runs counseling centre to deal with problems and for the educational guidance for the college students .The Department has glorious history of result in the college. Students of the Department graduate with flying colours and join various PG courses. Every year department organizes various student based curricular activities such as poster exhibition, essay competition, project presentations and students handbook of research papers. In the year of 2010-11 the department had organized a university level one day students level workshop on “Communicative Skills in Personality Development”. In September 2012 we published the students research hand-book ‘Manorang 2012’ which consist of 25 essays regarding Psychosocial issues, Mental health and various Psychotherapies.
BA Psychology
Programme outcomes
This course aims at enriching the minds of students and it has aims to develop a holistic and multidimensional understanding of the topics. It attempts to approach new areas of learning, develop competencies in the students thereby opening various avenues for self-discovery, academic understanding and employment. Students would be encouraged to develop an understanding of real life issues and participate in the programs and practices in the social context. Use of ICT and mass media and web based sources are highly useful to make the teaching-learning process interactive and interesting.
After completing BA in Psychology, students are acquainted with the following skills and knowledge .
Skills outcome:
Course FYBA
DSC-PSY– 1A: Foundations of Psychology
After the completion of this course students will be able to demonstrate the following competencies:
Course SYBA 2019 pattern
PSYCHOLOGY OF ABNORMAL BEHAVIOR-I (S1)
Learning Outcomes: After the completion of this course students will be able to:S2 DEVELOPMENTAL PSYCHOLOGY:
Learning Outcomes: After the completion of this course students will be able to:
1: Understand the importance, characteristics and concern in lifespan development
2: Understand biological, cognitive, and socio-emotional processes.
TYBA 2019 pattern
G3: INDUSTRIAL AND ORGANIZATIONAL PSYCHOLOGY
Outcomes: To acquaint the students with:
S4: PSYCHOLOGY PRACTICAL: TESTS AND EXPERIMENTS
Outcomes :
———————————————————————————————————–
![]() |
![]() |
मानसशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये विभागातर्फे वर्षभरात विविध स्पर्धा, प्रदर्शने अभ्यासभेटी, फिल्म शोज तसेच प्रकल्प सादरीकरणांचे आयोजन करण्यात आले. प्रथम सत्राची सुरुवात द्वितीय वर्ष कला विशेष स्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या फिल्म शो आणि स्वागत समारंभाने झाली.
जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने दिनांक 10 ऑक्टोबर 2022 ते 17 ऑक्टोबर 2022 या काळात मानसिक आरोग्य जाणीव जागृती आठवडा साजरा करण्यात आला. या निमित्ताने आठवडाभर भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दिनांक 10 ऑक्टोबर रोजी डॉ. प्रज्ञा तिखे यांचे शारीरिक व मानसिक आरोग्याची जाणीव यांचे उद्घाटनपर व्याख्यान घेण्यात आले. दिनांक 11 ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले. दिनांक 12 ऑक्टोबर रोजी मानसशास्त्रीय संकल्पनांवर आधारित विषयांवर पोस्टर प्रदर्शन आयोजिन करण्यात आले. विभागातील 25 विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण आणि मानसशास्त्राच्या उदयोन्मुख शाखांवर प्रकाश टाकणारे पोस्टर्स तयार केले होते. दिनांक 13 ऑक्टोबर रोजी मानसशास्त्रीय ग्रंथांचे तसेच संदर्भ पुस्तकांचे भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले. दिनांक 14 ऑक्टोबर रोजी मानसिक विकारांची ओळख करून देणारा ‘देवराई’ चित्रपट दाखवण्यात आला. दिनांक 15 ऑक्टोबर रोजी श्रीमती स्नेहल थानगे, समुपदेशक यांचा ‘How to Stay stress–free and happy’ या विषयांवर विद्यार्थ्यांशी संवाद आयोजित करण्यात आला. या उपक्रमाची सांगता दिनांक 17 ऑक्टोबर रोजी मन स्वास्थ्य है तो तन स्वस्थ है या विषयावरील पथनाट्याने करण्यात आली. यात विभागातील 15 विद्यार्थी सहभागी झाले होते तर 10 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या मनस्वास्थ्य विषयक घोष वाक्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती केली. जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने विभागातील डॉ. सुनंदा वाघमारे यांचा ‘दैनिक केसरी’ मध्ये ‘वाहतूक कोंडी आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर लेख प्रकाशित झाला.
अभ्यासक्रमाचा भाग तसेच सामाजिक बांधीलकीचे भान जपण्यासाठी दिनांक 19 नोव्हेंबेर 2022 रोजी विद्यार्थ्यांनी ‘शिवराय प्रतिष्ठान संचलित मतिमंद मुलांची निवासी शाळा’ हिंगणे येथे अभ्यास भेट दिली. तेथील निवासी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीचा मानसशास्त्रीय अभ्यास घेण्यात आला व तेथील मुलांना विभागातर्फे खाऊ वाटप करण्यात आले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत होणाऱ्या अविष्कार या विद्यार्थ्यांच्या संशोधन स्पर्धेत विभागतील तृतीय वर्षाच्या सौरभ मोरे याचा महाविद्यालयात प्रथम क्रमांक आला असून याच्या संशोधन प्रकल्पाची विद्यापीठ स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विभागातील ऋतुजा जगताप हिने राज्यस्तरीय ‘तायक्वांदो’ स्पर्धेत विशेष सहभाग प्रमाणपत्र व पदक प्राप्त केले आहे.
विभागतील साक्षी जवेरी व ऋषिकेश गायकवाड यांनी 6th National Cyber Psychology Conference मध्ये India Fights Cyber Violence या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
द्वितीय वर्ष कला मधील ऋषिकेश गायकवाड ह्याने E-Waste and Plastic Waste Awareness Collective Drive 2022 मध्ये महत्वपूर्ण सहभाग घेतला तर आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत Ministry Of Cultural Events मार्फत आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य मिळविले.
युवक महोत्सवात आयोजित केलेल्या स्वामी विवेकानंदांवरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत ऋषिकेश कदम व ऋषिकेश गायकवाड यांनी प्रमाणपत्र प्राप्त केले.
अण्णासाहेब आवटे, मंचर, कॉलेज येथे महाराष्ट्र दिनानिमित्त झालेल्या अभिमान महाराष्ट्र या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
मार्च 2023 मध्ये झालेल्या युवक महोत्सवात विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला यात साक्षी जवेरी, सौरभ मोरे, तनया बुटाला, वैष्णवी करपे, वैष्णवी डोराले, अनिकेत जगताप, रोहन जाधव, ऋषिकेश कदम, ऋषिकेश गायकवाड इ. विद्यार्थ्यांनी पोस्टर स्पर्धेत सहभाग नोंदवला. दुकान–जत्रा स्पर्धेत साक्षी जवेरी हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
विभागातील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय सेवा योजना तसेच राष्ट्रीय छात्र सेनेतील सहभाग उल्लेखनीय आहे. राष्ट्रीय सेवा योजनेतील विविध उपक्रमात विद्यार्थ्यांना विशेष पारितोषिके तसेच प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत.
अभ्यासक्रमाचा प्रात्यक्षिक भाग म्हणून तृतीय वर्ष विद्यार्थ्यांना विविध विषयावर अभ्यास प्रकल्प देण्यात आले तसेच आजूबाजूच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक चाचण्या घेण्यात आल्या.